Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : उद्यापासून पावसाचा जोर वाढणार; राज्यभरात शनिवारपासून ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Rain Forecast : हवामान विभागाने पुढील २ दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागात पाऊस सुरु होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात सध्या पावसाच्या जोरदारी सरी पडत आहेत. पण बहुतांशी भागात पावसाची विश्रांती दिसत आहे. तरी ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. हवामान विभागाने पुढील २ दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागात पाऊस सुरु होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

सध्या गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सौराष्ट्र आणि कच्छपासून उदयपूर, शिवपुरी, सिधी, अंबिकापूर, पुरी ते आग्नेयभागात बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. तसेच दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आहे. 

राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाची उघडीप दिसत आहे. पण दोन दिवसात राज्यात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने उद्या राज्यापासून राज्यात काही भागात पाऊस वाढेल, असा अंदाज दिला विदर्भातील सर्वच जिल्हे तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 

शनिवारी विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी पावासचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

रविवारी आणि सोमवारीही राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. रविवारी विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर सोमवारी राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT