Rain Alert : घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक

Rain News : कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस; उर्वरित राज्यात जोर ओसरला
Rain Alert
Rain AlertAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Weather News : पुणे : राज्यात जवळपास आठवडाभर दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर पावसाचा जोर ओसरू लागला आहे. मात्र कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अजूनही जोरदार पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. बुधवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत अंबोणे घाटमाथ्यावर सर्वाधिक १५७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. पाण्याची आवक सुरू असल्यामुळे अनेक धरणांतून विसर्ग सुरूच आहे.

कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरात ४८ मिलिमीटर, तर शहापूर, किन्हवली, डोळखांब ४१, कुंभार्ली ४२ मिलिमीटर पाऊस पडला. रायगडमधील आंगवली येथे ६२ मिलिमीटर, तर धामणंद ६० मिलिमीटर पाऊस पडला. सिंधुदुर्गमधील भेडशी येथे ८० मिलिमीटर पाऊस पडला असून, आबोली ६३, वैभववाडी ५७ मिलिमीटर पाऊस झाला. पालघरमधील डहाणू, मालयण येथे ५४, तलसरी ५३, झरी येथे ५० मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे कोकणातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून, धरणे जवळपास भरल्याने विसर्ग सोडण्यात आला आहे. घाटमाथ्यावर पावसाने जोर अधिक असला तरी सात घाटमाथ्यावर १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रातही नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार सरी बरसत आहेत. अधूनमधून ऊन पडत आहे. नाशिकमधील जागमोडी येथे ५३ मिलिमीटर, पुण्यातील वेल्हा येथे येथे ९९ मिलिमीटर, पानशेत ७४ मिलिमीटर, साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे १११ मिलिमीटर, तर तापोळा, लामज येथे ९९ मिलिमीटर पाऊस झाला. कोल्हापुरातील आंबा येथे ९२, करंजफेन येथे ६३ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे कोयना, उजनी, भंडारदरा, मुळा, भाटघर अशा काही महत्त्वाच्या धरणांतून पाण्याचा अजूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मराठवाडा विदर्भात पाऊस नसला, तरी काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.

Rain Alert
Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा


बुधवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत ः कृषी विभाग)

कोकण : तळोजे ४८, बिरवडी ९९, करंजवडी ६५, महाड, नाटे, खारवली, तुडील ४६, पोलादपूर, कोंडवी, वाकण ६५, शिर्शी, दाभीळ ४१, आंबवली, कुळवंडी ४४, भरणे ५३, मंडणगड ४३, खेडशी ४८, पाली ५०, , कोंडगाव ५३, देवरुख ५९, सौंदळ ५४, कोंडये ४२, ओणी ४३, पाचल ४४, भांबेड ५९, विलवडे ४३, पाटगाव ५०, सावंतवाडी, बांदा ४८, वेंगुर्ला ४०, तळेरे ४९, कुडाळ ४२, येडगाव ५३, भुईबावडा ४८, तळकट ५६, कडूस ४१, कांचगड ४५, तलवड ४६.

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ४५, धारगाव ४३, हरसूल, थानापाडा ४२, माले, मुठे ५९, भोलावडे ४३, नसरापूर ४१, कार्ला ५८, लोणावळा ५६, विंझर ५८, बामणोली ५३, केळघर ६५, करहर ४२, पाचगणी ४१, मलकापूर ३३, गगनबावडा ४८, कडगाव ५७, चंदगड, नारंगवाडी, हेरे ४०.


या घाटमाथ्यांवर पडला सर्वाधिक पाऊस :
घाटमाथा --- पडलेला पाऊस, मिमी
अंबोणे -- १५७
दावडी -- १५०
शिरगाव -- १४०
कोयना - १३९
ताम्हिणी -- ११२
डुंगरवाडी -- ११०
भिरा -- १०४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com