Rain  Agrowon
हवामान

Vidarbha Rain : विदर्भात पावसाचा जोर वाढणार

Vidarbha Rain Forecast : पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. १०) पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

वायव्य बंगालच्या उपसागरात वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) तयार झाले असून, सोमवारी (ता. ९) ही प्रणाली ओडिशाच्या पुरीपासून ५० किलोमीटर आग्नेयेकडे, परादीपपासून ९० किलोमीटर नैॡत्येकडे, आंध्र प्रदेशच्या कलिंगपट्टणम पासून १६० किलोमीटर ईशान्येकडे, तर पश्चिम बंगालच्या दिघापासून २६० किलोमीटर दक्षिणेकडे होती. वायव्येकडे सरकणारी ही वादळी प्रणाली सोमवारी सायंकाळी जमिनीवर येणार असून, तिची तीव्रता ओसरत जाणार आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाब पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला असून, राजस्थानच्या बिकानेर पासून, सिकार, खजूराहो, बिलासपूर, पूरी ते वादळी प्रणालीचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. उत्तर कर्नाटक ते केरळ पर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे.

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार कायम असून, सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर येथे उच्चांकी ३३.८ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा २८ ते ३४ अंशाच्या दरम्यान आहे. विदर्भासह, कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

आज (ता. १०) विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे

मंगळवारी (ता. १०) राज्यातील पावसाचा अंदाज दर्शविणारा नकाशा. (स्रोत : हवामान विभाग)

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : नागपूर, भंडारा, गोंदिया.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT