Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; राज्यातील तापमानात चढ उतार सुरुच

Weather Update : राज्यात सकाळी थंडी जाणवत असून दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. तर रविवारी विदर्भात पावसाचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News : देशातील किमान तापामानात चढ उतार सुरु आहेत. राज्यात सकाळी थंडी जाणवत असून दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. तर रविवारी विदर्भात पावसाचा अंदाज आहे. 

उत्तर भारतात थंडी कमी-अधिक होत आहे. पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमधील बहुतांशी भागांमध्ये किमान तापमान ९ अंश सेल्सिअस ते १३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

पंजाबमधील अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उत्तर भारतात १७० नॉट्स वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर भारतात विजांसह पाऊस, गारपिटीचा इशारा कायम आहे.

राज्यातही सकाळच्या सत्रात थंडी कायम दिसते. पण किमान तापमानात वाढ झाली आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. तर दुपारी बुहतांशी ठिकाणी किमान तसेच सरासरी तापमानात वाढ झाली.

राज्यातील बहुतांशी भागात दुपारचे तापमान सरासरी ३० ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. तर काही ठिकाणी ३५ अंश सेल्सिअसवर तापमान गेले होते. 

राज्यतील हवामान पुढील तीन दिवस कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर रविवारी अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील एक किंवा दोन ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT