Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; राज्यात पुढील काळात थंडी कशी राहील ?

Weather Forecast : राज्यातील अनेक भागात तापमानात चढ उतार सुरु आहेत. तर विदर्भ तसेच मराठवड्यातील चार जिल्ह्यांमध्ये तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागात तापमानात चढ उतार सुरु आहेत. तर विदर्भ तसेच मराठवड्यातील चार जिल्ह्यांमध्ये तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीटीची शक्यता जाणवते, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. 

विदर्भ आणि मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये २५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी म्हणजेच रविवार ते मंगळवारपर्यंतच्या ३ दिवसांत ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता आहे, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले.

विदर्भातील गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती अश्या चार जिल्ह्यांच्या उत्तरेकडील सीमावर्ती तालुक्यात सोमवारी तुरळक ठिकाणी किरकोळ गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. महाराष्ट्रातील उर्वरित २१ जिल्ह्यात मात्र पाऊस वीजा गारपीटीची शक्यता जाणवत नाही, असेही खुळे यांनी स्पष्ट केले.  

मग आता पावसाची शक्यता का निर्माण झाली, याविषयी बोलताना श्री. खुळे म्हणाले की, फेब्रुवारीअखेर सध्याच्या हिवाळी हंगाम संपून पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरु होण्याचा संक्रमणाचा हा काळ असतो.

साधारणपणे पूर्वमोसमी हंगामात पूर्व मध्य प्रदेश ते तामिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पूर्व किनारपट्टी समांतर वक्रकार हवेच्या कमी दाबाचा आस किंवा वारा खंडितता प्रणाली दिसू लागतात. ह्या आस किंवा पट्ट्याच्या पश्चिमेला उत्तेकडून तर पूर्वेला दक्षिणेकडून आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या मिलनातून गडगडाटीसह वीजा, गारांचा पाऊस कोसळत असतो.

सध्या अशीच हवेच्या कमी दाबाचा आस सहित वारा खंडितता प्रणाली असुन बंगालच्या उपसागतील  उच्च हवेच्या दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यातून आसाच्या पूर्वेला दक्षिणेकडून तर पश्चिमेला उत्तेकडून एक किमी. उंचीपर्यंत वारे वाहत आहेत. त्यामुळे फक्त विदर्भ मराठवाड्यातील १५ जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता निर्माण झाली आहे, असे श्री खुळे यांनी सांगितले.

थंडीविषयी बोलताना श्री. खुळे म्हणाले की, २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी पर्यंतच्या ३ दिवसात महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात उत्तरेकडून घुसणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पहाटेच्या किमान तापमान १४ तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सिअश दरम्यान जाणवत आहे. ही तापमाने जवळपास सरासरी इतके किंवा त्याखाली जाणवत आहे. महाराष्ट्रातील उर्वरित २७ जिल्ह्यात ही तापमाने काहीशी अधिक असून ती १७ व ३४ अंश सेल्सिअश दरम्यान जाणवत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT