Kharif Season: हवामान आणि वादळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पीक विमा योजनेकडेच आता शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे धक्कादायक वास्तव रायगड जिल्ह्यात समोर आले आहे. .खरीप हंगामात ९० हजार हेक्टर क्षेत्रावर भात आणि नाचणीची लागवड होणाऱ्या जिल्ह्यात ३१ जुलै ही पीक विम्याची अंतिम मुदत जवळ येऊन ठेपली आहे, तरीही केवळ ९१० शेतकऱ्यांनी विमा योजनेत नोंदणी केली आहे. त्यामुळे सरकारच्या जनजागृती मोहिमा आणि दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..Kharif Crop Insurance: सांगली जिल्ह्यात खरीप विम्यासाठी २६ हजार अर्ज.दरवर्षी बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसत असताना पीक विमा हा मोठा आधार ठरायला हवा होता, मात्र सध्या परिस्थिती वेगळीच दिसत आहे. मागील वर्षातील कटू अनुभव, नुकसानभरपाईस विलंब, बदललेले निकष यामुळे शेतकरी योजनेपासून दूर जात असल्याचे चित्र आहे. शासनाने हवामान आधारित पीक विमा योजना लागू केली असून, रायगड जिल्ह्यासाठी एफको-टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती केली आहे..Kharif Crop Insurance Compensation: खरीप पीकविम्यापोटी १६२४ कोटींचे वितरण.डिजटिल प्रक्रियेचा अडथळायंदा ॲग्री स्टॅक नोंदणी आणि ई-पीक नोंदणी बंधनकारक केली आहे. डिजिटल प्रक्रियेचा मोठा फटका शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया डोकेदुखी ठरत आहे..कृषी अधिकाऱ्यांकडून गावभेटीतून जनजागृतीकृषी विभागाकडून ग्रामसभा, गावभेटी, शेतभेटी, माहिती फलक आणि विविध माध्यमांतून जनजागृती केली जात असल्याचा दावा केला जात असला तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसून येत नाही. ९० हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत अवघ्या ९१० नोंदणी ही यंत्रणेच्या अपयशाचीच साक्ष देणारी आकडेवारी मानली जात आहे..आर्थिक फटकाभात पिकासाठी प्रति हेक्टर ६५० रुपये आणि नाचणीसाठी ४०० रुपये विमा हप्ता निश्चित केला आहे. भातासाठी ६५ हजार रुपये तर नाचणीसाठी ४० हजार रुपयांचे संरक्षण देण्याची तरतूद आहे. एक रुपयाची पीक विमा योजना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून अधिक रक्कम भरावी लागत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.