Farm Mechanization: कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०२५-२६ मध्ये ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित व स्वयंचलित औजारे खरेदी केलेल्या तसेच औजारे बँक स्थापन केलेल्या परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकऱ्यांचे १० कोटी ६२ लाख ६७ हजार ४० रुपये अनुदानाची अदायगी निधीअभावी रखडली आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे..केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेचा यात समावेश आहे. या योजनांअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, कंबाईन हार्वेस्टर, ट्रॅक्टरचलित औजारे, मनुष्यचलित व स्वयंचलित औजारे, औजारे बँक तसेच उच्च तंत्रज्ञान केंद्र उभारणी आदी घटकांसाठी अनुदानाची तरतूद आहे..Fruit Orchards Cultivation Issue: धाराशिव जिल्ह्यात फळबाग लागवडीला ब्रेक.या अंतर्गत २०२५-२६ मध्ये औजारे खरेदी करून मोठा कालावधी उलटला असला, तरी शेतकऱ्यांना अद्याप अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. तालुकानिहाय प्रलंबित अनुदान रक्कम (कंसात शेतकरी संख्या) पुढीलप्रमाणे : परभणी तालुका १ कोटी ९५ लाख ३८ हजार २७ रुपये (८६), जिंतूर तालुका १ कोटी २६ लाख २८ हजार ४४२ रुपये (९९), .Farm Machinery Subsidy: शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, अवजारे खरेदीसाठी अनुदान, कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी २० कोटींच्या निधीस मंजुरी.सेलू तालुका १ कोटी ४३ लाख १० हजार ५९० रुपये (५६), मानवत तालुका १ कोटी ३८ लाख ७९ हजार ४०० रुपये (४२), पाथरी तालुका १ कोटी ५८ लाख ४० हजार रुपये (९८), सोनपेठ तालुका ४६ लाख ७४ हजार रुपये (३१), गंगाखेड तालुका ३५ लाख ८८ हजार १५० रुपये (३९), पालम तालुका ५६ लाख ९१ हजार ४६८ रुपये (८७) आणि पूर्णा तालुका १ कोटी ६१ लाख १६ हजार ९६४ रुपये (१३१)..२०२४-२५ मध्ये ११.३४ कोटी रुपयांचा निधी खर्च...कृषी यांत्रिकीकरणांतर्गत परभणी जिल्ह्यासाठी २०२४-२५ मध्ये केंद्र पुरस्कृत योजनेत २ कोटी ७७ लाख ४२ हजार १९३ रुपये निधी (शंभर टक्के) खर्च झाला. राज्य पुरस्कृत योजनेत २ कोटी ३१ लाख ८५ हजार २८५ रुपये निधी (शंभर टक्के) खर्च करण्यात आला. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उपलब्ध २ कोटी ३१ लाख ८५ हजार २८५ रुपयांपैकी २ कोटी १ लाख ४१ हजार ३८० रुपये निधी (८६.८७ टक्के) खर्च झाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.