Maharashtra Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : चार जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामानाचा अंदाज

Weather Update : राज्यातील काही भागात कालापासून ढगाळ हवामान आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही पडल्या. तसेच हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टही दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात कालापासून ढगाळ हवामान आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही पडल्या. तसेच हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टही दिला. 

हवामान विभागाने आज अकोला, अमरावती, बुलडाणा आणि नागपूर जिल्ह्यात विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

रविवारीही रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

सोमवारी धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.

तर मंगळवारी नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT