Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : राज्यात पाऊस उघडीप देणार

Latest Rain News : अरबी समुद्रातील कमी दाब प्रणाली जमिनीवर येऊन विरून गेली आहे. यातच मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू असल्याने राज्यात पाऊस ओसरणार आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : अरबी समुद्रातील कमी दाब प्रणाली जमिनीवर येऊन विरून गेली आहे. यातच मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू असल्याने राज्यात पाऊस ओसरणार आहे.

आजपासून (ता. ३) राज्यात मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची हवामान विभागाने वर्तविली आहे.

वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. मॉन्सूनचा परतीसाठी पोषक स्थिती असल्याने दोन दिवसांत पश्चिम आणि मध्य भारताच्या आणखी काही भागांतून मॉन्सून माघारी परतण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि छत्तीसगड परिसरावर आहे. मध्य महाराष्ट्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळून या भागात चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या स्थितीपासून दक्षिण छत्तीसगड पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र जमिनीवर आल्याने दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस पडला. काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली.

राज्यात पाऊस ओसरण्याची शक्यता असून, आजपासून (ता. ३) राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT