Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain : शनिवारपासून पाऊस सुरु होणार; रविवार आणि सोमवारी राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज

Rain Update : राज्यातील अनेक भागात उद्यापासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. शनिवार ते सोमवार पावसाचे प्रमाण जास्त राहील.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागात उद्यापासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. शनिवार ते सोमवार पावसाचे प्रमाण जास्त राहील. सोमवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्टही देण्यात आला. 

हवामान विभागाने उद्या म्हणजेच शुक्रवारी नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज दिला. तर शनिवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि नांदेड तर खानदेशातली जळगाव, नंदूरबार आणि धुळे तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला. 

रविवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड तर खानदेशातील जळगाव, नंदूरबार आणि धुळे तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली. तसेच विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

सोमवारी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज असून संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर खानदेश, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. 

तर दुसरीकडे देशातील उच्चांकी तापमान आंध्र प्रदेशातील नांद्याल येथे ४३ अंश सेल्सिअसवर होते. राज्यात सोलापूर येथे ४२.२ अंशाची नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Summer Moong Sowing: खानदेशात उन्हाळ मूग पेरणीला प्रतिसाद

Sugar Export Ban: साखर निर्यात बंदी म्‍हणजे शेतकऱ्यांची लूट : अशोकराव थोरात

Swachhta Hi Seva Campaign: ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा ५०० वा टप्पा साजरा

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

SCROLL FOR NEXT