Rain Update
Rain UpdateAgrowon

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता; शनिवारी आणि रविवारी काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Rain Update : राज्यात आज आणि उद्या उन्हाचा ताप कायम राहण्याचा अंदाज आहे. तर शनिवारी आणि रविवारी राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
Published on

Pune News : राज्यात आज आणि उद्या उन्हाचा ताप कायम राहण्याचा अंदाज आहे. तर शनिवारी आणि रविवारी राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. 

हवामान विभागाने खानदेशातील धुळे, नंदूरबार आणि जळगाव तसेच नाशिक, सोलापूरसह मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, या जिल्ह्यातील काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

Rain Update
Summer Season : असह्य उन्हाळा करुया सुसह्य

तर यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज आहे. तसेच सांगली, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात हलक्या सरी पडतील, अशीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. 

Rain Update
Heat Wave : राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात मोठी वाढ

रविवारी राज्यात पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. रविवारी कोकणातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यात तसेच खानदेशातील धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर,

जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com