Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain : विदर्भात पावसाचा जोर वाढणार; माॅन्सूनने देशाचा बहुतांशी भाग व्यापला

Weather Update : पुढील ४ दिवस राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनने देशाचा बहुतांशी भाग व्यापला आहे. तर राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. पुढील ४ दिवस राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

राज्यातील काही भागात पुढील ४ दिवस पाऊस वाढण्याचाही अंदाज दिसत आहे. कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भात पुढील ४ दिवस ठिकठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

आज माॅन्सून उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात पोचला. माॅन्सूनची सिमा आज जैसलमेर, चुरू, भिवानी, दिल्ली, अलिगड, हरदोल, मुरादाबाद, उना, पठाणकोट आणि जम्मू भागात होती. माॅन्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान आहे.

त्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये माॅन्सून राजस्थानचा आणखा काही भाग, हरियानाचा उर्वरित भाग, संपूर्ण चंदीगड आणि पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मूचा उर्वरित भाग व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

Marigold Farming: तीन हंगामांत झेंडूचे हुशारीने नियोजन

Agriculture Success Story: कुक्कुटपालन पूरक नव्हे, झाला मुख्य व्यवसाय

Sugarcane Farmer Issues: कष्ट शेतकऱ्यांचे, नफा इतरांचा

India Sugar Crisis: आकडे आणि नामुष्की

SCROLL FOR NEXT