Monsoon 2024 Agrowon
हवामान

Monsoon Rain : विदर्भ, कोकणात पावसाचा जोर वाढणार; मराठवाड्यातही पावसाचा जोर दोन दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता

Weather Update : राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील बहुतांशी ठिकाणी अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम दिसते. राज्यात ठिकठिकामी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे पण तो सर्वदूर नाही. राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने उद्या विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गोंदीया तसेच गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर नाशिक, नगर, जळगाव, छत्रपती संभाजीनंगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज दिला. 

शनिवार आणि रविवार संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच खानदेशातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मध्यम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर तसेच कोकणातील सिंधुदूर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. 

सोमवारी राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर तसेच कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT