Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Forecast : राज्यात पावसाचा जोर वाढणार

Maharashtra Rain Prediction : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होताच राज्याच्या अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Maharashtra Latest Monsoon Update : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होताच राज्याच्या अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. मॉन्सून सक्रिय झाल्याने आज (ता. १७) कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित विदर्भासह मराठवाड्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरात उत्तर ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि झारखंडमध्ये कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाब पट्ट्याचा पश्‍चिम भाग सर्वसाधारण स्थितीत असून, पूर्व भाग दक्षिणेकडे आला आहे.

मॉन्सूनचा आस राजस्थानच्या गंगानगर, नर्नूल, अलिगड, वाराणसी, दाल्टोनगंज, कमी दाब क्षेत्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत मॉन्सूनचा आस सक्रिय आहे.

राज्यात ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज (ता. १७) पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे.

कोकणातील, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. विदर्भाच्या उर्वरित भाग, नांदेड जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

आज (ता. १७) राज्यातील पावसाचा इशारा दर्शविणारा नकाशा. (स्रोत : हवामान विभाग)

अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पुणे

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

नांदेड, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT