Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यातील बहुतांशी ठिकाणी पावसाचा अंदाज

Rain Forecast : राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. तर त्यानंतर जोर काहीसा कमी होऊ शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागात मागील तीन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. तर राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. तर त्यानंतर जोर काहीसा कमी होऊ शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

सोमवारी बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या कमी दाब क्षेत्रापाठोपाठ शक्रवारपर्यंतपुन्हा नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागाने आज राज्यातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरादर पावसाचा रेड अलर्ट दिला. तर सातारा आणि पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. तर सिंधुदूर्ग, कोल्हापूर, ठाणे, छत्रपती संभाजीनग, जालना, परभणी, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

तर उर्वरित जिल्ह्यांना काही ठिकाणी  उद्या कोकणातील सिंंधुदूर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

बुधवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र कोकण आणि मध्यमहाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात तसेच संपूर्ण विदर्भत काही ठिकाणी जोरदार पावासाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT