Weather Report Agrowon
हवामान

Weather Report : दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा इशारा कायम

IMD Report : आज (ता. ७) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Team Agrowon

Rain Update : राज्याच्या दक्षिण भागात पावसाला पोषक हवामान झाले आहे. यातच राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान होत असल्याने किमान तापमानात वाढ होत थंडी कमी झाली आहे. दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. आज (ता. ७) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकणात कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांच्या वरच असून, उर्वरित राज्यातही कमाल तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात उन्हाची ताप अधिक असल्याने डहाणू येथे उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस, उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३२ ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे.


ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ कायम असून, बहुतांश ठिकाणी पारा १५ अंशाच्या वरच आहे आहे. सोमवारी (ता. ६) छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील नीचांकी १४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यातच पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ७) दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची इशारा हवामान विभागाने दिला आहे.


सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३२.१ (१६.१), जळगाव ३३.९ (१६.२), कोल्हापूर ३२.२ (२१.०), महाबळेश्वर २५.८ (१६.८), नाशिक ३२.३ (१६.०), निफाड ३२.३ (१६.०), सांगली ३१.५ (२०.३), सातारा ३१.८ (१९.५), सोलापूर ३४.२ (१८.८), सांताक्रूझ ३६.१ (२२.८), डहाणू ३६.४ (२२.६), रत्नागिरी ३४.५ (२४.०), छत्रपती संभाजीनगर ३१.८ (१४.२), नांदेड - (१८.४), परभणी ३३.१ (१८.१), अकोला ३४.० (१६.६), अमरावती ३२.० (१७.५), बुलडाणा ३३.० (१७.२), ब्रह्मपुरी ३३.६ (१८.०), चंद्रपूर ३२.६(१९.०), गडचिरोली ३२.० (१७.२), गोंदिया ३२.४ (१५.५), नागपूर ३२.१ (१५.५), वर्धा ३१.८(१६.५), वाशीम ३२.६(१५.८) यवतमाळ ३३.० (१५.२).
---

कमी दाब क्षेत्राची होतेय निर्मिती

आग्नेय अरबी समुद्रामध्ये केरळच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पूर्व-मध्य अरबी समुद्रात उद्यापर्यंत (ता. ८) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. वरील प्रणालीपासून दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT