Rain Update  Agrowon
हवामान

Rain Forecast : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी

Rain Update : कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहे.

अमोल कुटे

Pune News : कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहे. आज (ता. १०) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र निवळून गेले आहे. या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यातच पावसाला पोषक हवामान आणि ढगाळ आकाशामुळे राज्याच्या कमाल-किमान तापमानात चढ-उतार सुरूच असून उकाडा कायम आहे.

बुधवारी (ता. ८) कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, मुंबईसह कोकणात हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. गुरुवारी (ता. ९) पहाटे सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या.

पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. १०) दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम आहे. तर रायगड, पुणे जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जळगावात नीचांकी १४.७ अंश तापमान

गुरुवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये डहाणू येथे उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस, उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३० ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी काहीशी कमी झाली आहे.

मात्र पहाटेच्या वेळी काहीसा गारठा आणि धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे. गुरुवारी (ता. ९) जळगाव येथे राज्यातील नीचांकी १४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

गुरुवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २९.५ (१९.४), जळगाव - (१४.७), कोल्हापूर २३.७ (२०.५), महाबळेश्वर २३.८ (१७.४), नाशिक ३१.७ (१७.९), निफाड ३१.८ (१६.१), सांगली २५.३ (२०.३), सातारा २६.५ (१९.७), सोलापूर २८.० (२०.०), सांताक्रूझ ३४.८ (२५.४), डहाणू ३७.४ (२४.६), रत्नागिरी ३१.१ (२२.३),

छत्रपती संभाजीनगर ३२.२ (१६.६), नांदेड ३२.८ (२३.०), परभणी ३२.६ (२१.९), अकोला ३४.८ (१८.५), अमरावती ३३.२ (१७.७), बुलडाणा ३३.० (१८.०), ब्रह्मपुरी ३५.७ (१८.०), चंद्रपूर ३२.८(१७.६), गडचिरोली ३३.४ (१७.०), गोंदिया ३२.६ (१६.६), नागपूर ३३.० (१७.३), वर्धा ३३.०(१९.०), वाशीम ३३.८(१८.२) यवतमाळ ३५.० (१७.२).

जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा :

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली.

विजांसह पावसाचा इशारा :

रायगड, पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT