Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

राज्याच्या कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत आहे. यातच वादळी पावसाचे सावट कायम असल्याने ढगाळ हवामान होत आहे.

Team Agrowon

पुणे : राज्याच्या कमाल तापमानाचा (Maximum Temprature) पारा हळूहळू वाढत आहे. यातच वादळी पावसाचे सावट कायम असल्याने ढगाळ हवामान होत आहे.

आज (ता. ४) राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहून, मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात पावसाला पोषक हवामान होत असतानाच, ढगाळ वातावरण आणि उकाड्यात वाढ झाली आहे. परभणी शहर आणि परिसरात बुधवारी (ता. ३) दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. यातच राज्याच्या कमाल तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३६ अंशांच्या दरम्यान आहे. तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.

नैर्ऋत्य मध्य प्रदेशापासून मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती आहे.

कर्नाटक आणि तमिळनाडू परिसरासह दक्षिण छत्तीसगड आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :


पुणे ३३.४ (१९.७), जळगाव ३६ (२४.२), कोल्हापूर ३३.६ (२३), महाबळेश्‍वर २६.७ (१६), नाशिक ३३.१ (२०.५), निफाड ३५.४ (२०.६), सांगली ३४.५ (२२.२), सातारा ३४.५ (२०.९), सोलापूर - (२४.३), सांताक्रूझ ३२.८ (२५.६), डहाणू ३३.४ (२४), रत्नागिरी ३४.० (२५.१), छत्रपती संभाजीनगर ३३.४ (२०.४), नांदेड ३३.४ (२१.२), धाराशिव ३५.१ (२१.६), परभणी ३३.६ (२२.१), अकोला ३४.६ (२१.१), अमरावती ३०.६ (१८.९), बुलडाणा ३१.४ (२१), ब्रह्मपुरी ३३.४ (१८.१), गडचिरोली ३१.४ (२१.२), गोंदिया २९.५ (२२), नागपूर ३०.४ (२०.१), वर्धा ३२.५ (२०.८), वाशीम ३२.६ (२०), यवतमाळ ३२.७ (१७.५).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र, : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.


मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत
बंगालच्या उपसागराच्या अग्नेय भागात शनिवारपर्यंत (ता. ६) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे या भागात रविवारपर्यंत (ता. ७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहेत.

या प्रणालीची तीव्रता वाढून उपसागरात चक्रीवादळ घोंघावण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. ही वादळी प्रणाली उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू दरात सुधारणा, उडीद दर टिकून, बटाटा बाजारात चढ-उतार, पेरू दरात तेजी, चिकू दरात चढ-उतार

Shri Mangal Wheat: ‘श्री मंगल’ गव्हाचा नवा वाण ; हेक्टरी ५२ क्विंटल उत्पादनाची क्षमता

Crop Damage Survey: अहिल्यानगरला साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण

Shivraj Singh Chouhan: काँग्रेसच्या सलग पराभवाला कारण कोण? शिवराज सिंह चौहान यांचा राहुल गांधींवर निशाणा

Monsoon Return: देशाच्या उर्वरित भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती; राज्यात उन्हाचा चटका कायम

SCROLL FOR NEXT