Monsoon  Agrowon
हवामान

Rain Alert Maharashtra : राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज; काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा

Heavy Rain Warning : आज राज्यातील विविध भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

Dhananjay Sanap

Pune News : राज्यात विविध भागात आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली. तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे. आज राज्यातील विविध भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर पुढील चार दिवस राज्यातील विविध भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. 

आज कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वारे, विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा, पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. पुढील चार दिवस राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT