Vidarbha Rain Update Agrowon
हवामान

Vidarbha Rain : उद्या विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; शुक्रवारपासून अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज

Yellow Alert for Vidarbha : हवामान विभागाने उद्या विदर्भ आणि मराठवड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.

Team Agrowon

Vidarbha Weather Update : विदर्भातील काही भागात आज हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. पण राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने दडी दिली. अधूनमधून ढगाळ वातावरण दिसत असले तरी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. हवामान विभागाने उद्या विदर्भ आणि मराठवड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने आज विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला होता. मात्र काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. तर हवामान विभागाने उद्याही विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला. विदर्भातील गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

तसेच मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर खानदेशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही ठिकठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला.

शुक्रवारी विदर्भातील अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.  तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. तसेच मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली तसेच खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT