Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : राज्यात तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार; विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज

Rain Update : हवामान विभागाने पुढील ३ दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागात कालपासून पाऊस हजेरी लावत आहे. अनेक भागात पावसाने पिकांचे नुकसानही केले आहे. हवामान विभागाने पुढील ३ दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला. 

राज्यातील बहुतांशी भागात आजही पाऊस पडला. काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. उद्याही राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला. कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

तर मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच नगर आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

कोल्हापूर, सातारा, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्टही हवामान विभागाने दिला. 

गुरुवारी संपूर्ण कोकण आणि संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. शुक्रवारी मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT