Rain Update
Rain Update Agrowon
हवामान

Nagar Rain Update : नगरमधील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

Team Agrowon

Rain Update News : नगर जिल्ह्यातील अनेक भागांत गुरुवारी (ता. १६) उशिरा वादळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या.

वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसह आंबा, द्राक्ष (Grape), संत्री-मोसंबी या फळबागांचेही नुकसान (Orange Orchard Damage) झाले.

नगर जिल्ह्यात मागील आठवड्यात वादळी पाऊस झाला. या पावसाने सुमारे पाच हजार शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला. गुरुवारी सायंकाळी उशिरा पुन्हा नगर जिल्ह्याच्या उत्तरेतील श्रीरामपूर, राहुरीच्या काही भागात पावसाने हजेरी लावली.

दक्षिण भागातील नगर तालुका, जामखेड, श्रीगोंदे, पारनेर आणि अहमदनगर शहरात सायंकाळी पाचपासूनच सोसाट्याच्या वाऱ्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

अहमदनगर शहरात पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला. मध्यम स्वरूपाचा पाऊस सुमारे अर्धा तास झाला. जिल्ह्यात गव्हाची काढणी सुरू आहे.

त्यामुळे काढणीला आलेल्या गव्हाचे तसेच हरभऱा, ज्वारीचे पावसाने नुकसान झाले. वाऱ्यामुळे आंब्याची फळ व मोहर गळती झाली. द्राक्षालाही याचा फटका बसला.

सातारा जिल्ह्यात हलका पाऊस

सातारा जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) काही ठिकाणी हलका पाऊस झाला. दुपारपासून ढगाळ वातावरण होऊन पावसास सुरुवात झाली. बुधवारच्या (ता. १५) तुलनेत गुरुवारी पावसाचे प्रमाण कमी होते. पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान सुरू आहे.

फळ पिकांना या पावसाचा फटका बसणार आहे. शुक्रवारी (ता. १७) सकाळी धुके पडले होते. त्यानंतर दुपारपर्यंत बहुतांश भागात ढगाळ वातावरण झाले होते. जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता असून पीक नुकसानीच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.

विजांचा कडकडाट होत असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात अवकाळी पावसामुळे जीवितहानीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. विजांचा कडकडाट होत असल्यास सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा.
डॉ. वीरेंद्र बडदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Tourism Festival : ग्रामसंस्कृतीतून राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी

Cotton Variety : एका कापूस वाणाची जादा दराने विक्री

Hailstorm : माण तालुक्यात बिजवडी, जाधववाडी परिसरात गारपीट

Agriculture Input Seized : अप्रमाणित निविष्ठा प्रकरणी वर्षभरात ७२ फौजदारी गुन्हे

Water Scarcity : इंदापूर तालुक्यात टँकरची मागणी वाढली

SCROLL FOR NEXT