Nagar District Bank : बॅंकेच्या निवडणुकीतून राजकारण बदलाचे संकेत

शेळके यांच्या निधनाने अध्यक्षपद रिक्त झाले. बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या बहुतेक निवडणुका बिनविरोध होण्याचा पायंडा आहे.
Nagar District Bank
Nagar District BankAgrowon

Nagar News : सहकारातील आशिया खंडात सर्वाधिक नावाजलेली बॅंक म्हणून सर्वदूर ओळख असलेल्या नगर जिल्हा सहकारी बॅंकेवर राजकीय डावपेच आणि संचालकांना आपलेसे करत बॅंकेचे अध्यक्षपद हिसकावत बॅंकेवर वर्चस्व तर मिळवलेच, पण वर्षानुवर्षे सत्ता असलेल्या पवार परिवारासह माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) यांनाही झटका दिल्याचे पाहायला मिळाले.

महाविकास आघाडीकडे पूर्णपणे बहुमत असतानाही अध्यक्षपद मिळविल्याने आता नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीसह विधानसभेच्या राजकारणातही बरेच बदल होण्याचे संकेतच या निवडीने दिले आहेत.

अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपला मत करणारे ते चार सदस्य कोण याचीच आता नगर जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा होत आहे.

Nagar District Bank
Jalgaon District Bank : जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पवार

सहकार आणि राजकारणात राज्यात मोठा दबदबा असलेल्या नगर जिल्ह्यातील राजकारणाला जिल्हा परिषद आणि जिल्हा बॅंकेपासून होते. आशिया खंडात सहकारातील नावलौकीक मिळवलेली बॅक म्हणून नगर जिल्हा सहकारी बँकेची ओळख आहे.

जिल्हा बॅंकेच्या राजकारणात संचालक मंडळाच्या निवडणुका पक्षविरहित झाल्या. दोन वर्षांपूर्वीही तशीच स्थिती होती. त्या वेळी अध्यक्षपद राष्ट्रवादीला, तर उपाध्यक्षपद काँग्रेसला दिले. अॅड. उदय शेळके व माधवराव कानवडे बिनविरोध अध्यक्ष, उपाध्यक्ष झाले.

शेळके यांच्या निधनाने अध्यक्षपद रिक्त झाले. बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या बहुतेक निवडणुका बिनविरोध होण्याचा पायंडा आहे; परंतु या वेळी मतदान घेण्याची वेळ आली. खरं तर या वेळीची अध्यक्ष निवडही बिनविरोध होईल असेच वातावरण होते.

मात्र भाजपने निवडणूक लढवून व महाविकास आघाडीचे चार संचालक फोडून अध्यक्षपद मिळवत माजी आमदार शिवाजी कर्डिले निवडून आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या संचालकांची एक दिवस आधी झालेली बैठक झाली. तेथे भाजपला बोलावले नाही आणि येथेच राजकारण शिजले.

Nagar District Bank
Crop Loan : धुळे जिल्हा बँक देणार एप्रिलपासून नवीन पीककर्ज

जिल्हा बॅक ही जिल्ह्याची कामधेनू. आशिया खंडातील सहकार क्षेत्रातील पहिली बॅक म्हणून तिचा लौकिक आहे. वीस संचालकांपैकी महाविकास आघाडीतील महाविकास आघाडीचे चौदा संचालक असल्याने साहजिक राष्ट्रवादीचा अध्यक्ष होईल, हे निश्‍चित होते.

महाविकास आघाडीतील नेते विरोधी पक्षनेते अजित पवार व काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात हे सांगतील, त्यांनाच संधी मिळणार होती. मात्र या अनपेक्षित घडामोडीमुळे सर्वजण अवाक् झाले.

आता फुटलेले चार जण कोण, नाराजांनी तर झटका दिला नाही ना, अशी चर्चा आहे. जिल्हा बॅंके अध्यक्षपदाच्या निवडीचा आता जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर निवडणुकांवर परिणाम होणार असल्याचे दिसत आहे.

त्या बैठकीनेच वातावरण बदलवले...

नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत नगरमध्ये त्यांच्या उपस्थितीत संचालकांची बैठक झाली. या बैठकीला भाजपच्या संचालकांना बोलाविण्यात आले नव्हते.

भाजप संचालकांना दूर ठेवून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणे, हेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, ज्येष्ठ संचालक कर्डिले यांना सलत होते.

त्याचाच वचपा काढला. अध्यक्षपदासाठी कर्डिलेंचे नाव फायनल झाले आणि संचालक गळाला लावत थेट बिनविरोध ऐवजी मतदान घेऊन भाजपने अध्यक्षपदच हिसकावले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com