Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain : राज्यात पाऊस, उष्णतेच्या लाटेचा इशारा; अनेक भागात उन्हाचा चटका वाढला 

Weather Update : हवामान विभागाने आज आणि उद्या काही भागात गारपीट, पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा अनुभव वेगवेगळ्या भागांना येत आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसानेही मागील सात दिवसांपासून हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या काही भागात गारपीट, पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.

हवामान विभागाने आज रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई, नाशिक, धुळे, जळगाव, आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.

तर पुणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, कोल्हापूर, नगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज दिला. 

उद्या रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर नाशिक, धुळे, नंदूरबार, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

तर सोलापूर, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT