Maharashtra Rain : राज्यातील ११ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; काही भागात पावसाचाही इशारा

Weather Update : आज आणि उद्याही अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
Rain Forecast
Rain ForecastAgrowon

Pune News : राज्यात सध्या उन्हाचा चटका आणि पाऊस असे वातावरण आहे. मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या. तसेच आज आणि उद्याही अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

Rain Forecast
Heat Wave : कोकणात उष्ण लाटेचा इशारा

हवामान विभागाने आज राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात पावसाचा अंदाज दिला. हवामान विभागाने कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर, बीड, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.

Rain Forecast
Maharashtra Rain : आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज; राज्यात उन्हाचा चटकाही कायम

तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला. 

तसेच उद्याही राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. कोकणातील रत्नागिरी, रायगड, मुंबई आणि ठाणे तर नाशिक, जळगाव, सोलापूर आणि बीड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तर सातारा, सांगली, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जेनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com