Rain Forecast Agrowon
हवामान

Vidarbha Rain : विदर्भात पाऊस, गारपीटीचा इशारा; विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

Rain Forecast : विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

Anil Jadhao 

Pune News : हवामान विभागाने १६ मार्चपासून म्हणजेच शनिवारपासून तीन दिवस विदर्भात पावसाचा अंदाज दिला. विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. 

हवामान विभागाने शनिवारी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

तर रविवारी अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

तसेच रविवारी चंद्रपूर, गोंदीया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीची शक्यताही असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

तर सोमवारीही भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर या काळात काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसेच राज्याच्या इतर भागात हवामान कोरडे राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT