Rain Agrowon
हवामान

Rain Forecast : विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon 2023 Update : पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. १६) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे

Team Agrowon

Maharashtra Rain News: कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या सरीमागून सरी कोसळत आहेत. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. १६) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित विदर्भासह मराठवाड्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस सर्वसाधारण स्थितीत आला असून, राजस्थानच्या गंगानगर, हिस्सार, अलिगड, ओराई, सिधी, डाल्टेनगंज ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत मॉन्सूनचा आस सक्रिय आहे.

पश्चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. उत्तर ओडिशा, पश्चिम बंगाल परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर, तर दक्षिण गुजरात आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

मॉन्सून सक्रिय असल्याने कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळत आहे. उर्वरित राज्यातही ढगाळ हवामानासह हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत.

आज (ता. १६) कोकणातील ठाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा आहे.

विदर्भाच्या उर्वरित भागासह पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, अकोला, नागपूर, गोंदिया, भंडारा

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT