Cloud Agrowon
हवामान

Marathwada Rain : उद्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Marathwada Monsoon News : राज्यातील काही भागात काल म्हणजेच सोमवारी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या. पण आज बहुतांशी भागांमध्ये उन्हाचा चटका वाढला होता

Team Agrowon

Maharashtra Rain Update : पुणेः राज्यातील काही भागात काल म्हणजेच सोमवारी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या. पण आज बहुतांशी भागांमध्ये उन्हाचा चटका वाढला होता. दुसरीकडे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. तर हवामान विभागाने उद्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला.

हवामान विभागाने उद्या राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज दिला. उद्या मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला.

तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

राज्यात काही भागात पाऊस पडतो. पण या पावसाचे स्वरुप सार्वत्रिक नाही. तसेच खूपच कमी ठिकाणी पाऊस पडत आहे. आज नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये ठिकठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर कोकणाताली रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT