Monsoon 2023 : विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज

Imd forecast : कोकणातील रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.
Kharif season 2023
Kharif season 2023Agrowon
Published on
Updated on

Rain Alert : राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये आज पाऊस नव्हता. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होते, तसेच हलक्या ते मध्यम पावसानेही हजेरी लावली. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर तुलनेत अधिक दिसतो. सकाळपासून ऊन सावल्यांचा खेळही पाहायला मिळाला. तर हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला.

Kharif season 2023
Rain Forecast : कोकण, घाटमाथ्यावर पाऊस पुन्हा जोर धरणार

माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तर प्रदेशातील गोरखपूर, पटना, श्रीनिकेतन, कानिंग भागात आहे. बंगाल उपसागराच्या ईशान्य भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. हे कमी दाब क्षेत्र २५ किलोमीटर प्रतितास वेगाने उत्तर वायव्येकडे सरकत आहे. या कमी दाब क्षेत्राचे बांगलादेशच्या किनाऱ्याजवळ बंगालचा उपसागराच्या ईशान्य भागात अति दाब क्षेत्रात रुपांतर झाले आहे.

राज्याच्या अनेक भागात आज पावसाचा जोर कमी होता. पावसाने राज्याच्या बहुतांशी भागात विश्रांती घेतली होती. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम पाऊस पडला. तर विदर्भ आणि मराठवड्यातही काही मंडलांमध्ये हलक्या सरी पडल्या. खानदेशातही काही ठिकाणी पावसाची रिमझीम झाली. पण जोरदार पाऊस नव्हता. राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी होत आहेत. तर बहुतांशी भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि ऊन सावल्यांचा खेळ सुरु होता.

Kharif season 2023
Dam Water Storage : पश्चिम विदर्भात वेगाने वाढतोय प्रमुख प्रकल्पांतील साठा

हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला. आज कोकणातील रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मराठवड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

विदर्भातही काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. हवामान विभागाने आज विदर्भातील यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर बुलडाणा, अकोला आणि वाशीम जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्याच्या इतर भागांमध्येही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com