Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain : आज आणि उद्याही पावसाचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update : राज्यातील काही भागात चार दिवसांपासून वादळी पावसाची हजेरी कायम आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. तर दुसरीकडे इतर भागात उन्हाचा चटका कायम आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात चार दिवसांपासून वादळी पावसाची हजेरी कायम आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. तर दुसरीकडे इतर भागात उन्हाचा चटका कायम आहे. तसेच आज आणि उद्याही हवामान विभागाने काही भागात पावसाचा अंदाज जाहीर केला. 

सौराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती आणि

नागपूर जिल्ह्यात तर मराठवड्यातील जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला. तसेच छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या पावसाचीही शक्यता आहे. 

उद्या म्हणजेच रविवारी विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Sales Decline: टरबूज विक्रीवर मुंबईतील घटनेचे सावट

Farm Roads: वर्षानुवर्षे बंद असलेले ‘शिवरस्ते’ झाले मोकळे

Monsoon 2026: यंदा मॉन्सून दगा देणार?; 'एल निनो'मुळे खरीप पीक उत्पादन घटणार, 'आयसीएआर'च्या अभ्यासातून चिंता व्यक्त

Crop Insurance Compensation: पीकविमा भरपाईचे ३३६ कोटी तातडीने वाटप करा : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Farm Pond Lining: शेततळ्याचे अस्तरीकरण कसे करावे; अस्तरीकरणासाठी शासनाकडून अनुदान किती?

SCROLL FOR NEXT