Monsoon Rain Agrown
हवामान

Monsoon Rain : विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; माॅन्सून गेल्या १३ दिवसांपासून एकाच भागात मुक्कामावर

Weather Forecast: माॅन्सूनने आजही प्रगती केली नाही. मात्र राज्यात काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सूनने आजही प्रगती केली नाही. मात्र राज्यात काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

राज्यात माॅन्सून गेल्या १२ दिवसांपासून एकाच भागात आहे. माॅन्सूनची सिमा आजही मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट परिसरात आहे. माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान नाही. त्यामुळे माॅन्सून एकाच भागात आहे. तर राज्यात पावसासाठी पोषक आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागाने पुढील ५ दिवस विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. अनेक भागात पावसाचा येलो अलर्टही देण्यात आला.

मराठवाड्यातील परभणी, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

पुढील ५ दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Acquisition: शेतजमिनीचे बेकायदेशीर अधिग्रहणाचा आरोप

Rabi Sowing: सांगली जिल्ह्यात रब्बी पेरा पावणेदोन लाख हेक्टरवर

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस आवक मंदावली, मटारच्या दरात नरमाई, बटाटा आवक चांगली तर ज्वारीचे दर टिकून

Ramling Sanctuary: रामलिंग अभयारण्यातील वाघाच्या वास्तव्याची वर्षपूर्ती

Urea Smuggling: युरिया तस्करीचा डाव उधळला

SCROLL FOR NEXT