Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता 

Weather Update : हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला. तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला. तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

हवामान विभागाने आज आणि उद्या कोकणातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला. तसेच रत्निगारी, रायगड, कोल्हापूर, नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भाती काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला. 

तसेच उद्या नगर आणि नाशिक जिल्ह्यातही वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला.

शुक्रवारी कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे तसेच नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातही वादळी पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागातही वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT