Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Return : कोल्हापूर, सिंधुदूर्गात पावसाचा अंदाज; देशातील अनेक भागातून माॅन्सूनची आज माघार

IMD alert : राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Monsoon Back : माॅन्सूनने देशातील आणखी भागातून आज काढता पाय घेतला. माॅन्सूनने आज परतीच्या प्रवासाचा मोठा टप्पा पार केला. तर राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातही काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

माॅन्सूनने आज देशातील आणखी काही भागातून माघार घेतली आहे. आज झारखंड आणि छत्तीसगडच्या उर्वरित भागातून माॅन्सून माघारी फिरला. तर पश्चिम बंगालचा बहुतांशी भाग, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, तेलंगणाचा बहुतांशी भाग आणि कर्नाटकच्या काही  भागातून माॅन्सूनने माघार घेतली आहे. महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या काही भागात माॅन्सून आहे. सध्या माॅन्सूनची सीमा फोरबेसगंज, माल्दा, विशाखापट्टनम, नालगोंडा, रायचूर आणि वेंगुर्ला या भागात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT