Rain Forecast  Agrowon
हवामान

Maharashtra Rain: पुढील पाच दिवस कोणत्या भागात पावसाचा अंदाज? राज्याच्या इतर भागात काय परिस्थिती राहू शकते?

Latest Rain News : राज्यातील तापमानात मागील काही दिवसांपासून चढ उतार होत आहेत. तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

अनिल जाधव

Pune News : राज्यातील तापमानात मागील काही दिवसांपासून चढ उतार होत आहेत. तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. राज्याच्या काही भागात पुढील पाच दिवस पावासाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

राज्यात वातावरणातील गारवा वाढला. तर हवामान विभागाने आज सिधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

तर रत्नागिरी, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला होता. तसेच उद्याही सिधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट आहे. तर सांगली, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

तर सोमवारी सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच मंगळवारी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. बुधवारी सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात पावसाचा शिडकावा होऊ शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT