Weather Update Agrowon
हवामान

Monsoon Rain 2024 : राज्यात ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात माॅन्सूनसाठी पोषक हवामान; दाखल होण्याची वेध

Maharashtra Weather Update : माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये माॅन्सून राज्यात दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. माॅन्सून  माॅन्सूनची प्रगती सुरुच आहे. माॅन्सूनने आज कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणाच्या काही भागात चाल केली. तर माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये माॅन्सून राज्यात दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने आज कर्नाटक, रायलसिमा, किनारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या आणखी काही भागात प्रगती केली. तसेच अरबी समुद्राचा आणखी काही भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात माॅन्सून दाखल झाला. माॅन्सूनची सिमा आज कर्नाटकातील होन्नावर, बल्लारी, आंध्र प्रदेशातील कुरनूल, तलंगणातील नरसापूर आणि पश्चिम बंगालमधील इस्लामपूर या भागात होती. 

माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे माॅन्सून पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये देशाच्या आणखी काही भागात वाटचाल करू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला. माॅन्सून दक्षिण महाराष्ट्र, गोव्यात दाखल होऊ शकतो.

तर कर्नाटक, रायलसिमा, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा उर्वरित भाग, छत्तीसगड आणि ओडिशाचा आणखी काही भाग, तर बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात माॅन्सून पुढच्या ४ ते ५ दिवसांमध्ये दाखल होऊ शकतो, अशा अंदाज हवामान विभागाने दिला.  

हवामान विभागाने आज राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर बहुतांशी भागात पावसाचा अंदाज दिला. कोकणातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला.

तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातही ठिकठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. पुढचे चार दिवसही राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT