Weather Agrowon
हवामान

Monsoon Rain : राज्यात ४ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात माॅन्सून दाखल होण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती

Weather Update : तीन दिवसांमध्ये माॅन्सून महाराष्ट्रासह इतर काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. तर राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील शेतकऱ्यांचे माॅन्सूनकडे लक्ष लागून आहे. पण आज माॅन्सूनने एकाच जागेवर मुक्काम केला. माॅन्सूनचा प्रवास आज थांबला होता. पण माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील तीन दिवसांमध्ये माॅन्सून महाराष्ट्रासह इतर काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. तर राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने काल प्रगती करत संपूर्ण गोवा राज्य व्यापले होते. तसेच कर्नाटकचा आणखी काही भाग, अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तेलंगाणाचा आणखी काही भाग आणि संपूर्ण रायलसिमा व्यापला आहे. आज माॅन्सूनने प्रगती केली नाही. त्यामुळे माॅन्सूनची सिमा गोवा, गडग, नारायणपेठ, नरसापूर आणि इस्लामपूर भागात कायम होती. 

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून माॅन्सूनची वाटचाल कायम राहण्याचा अंदाज आहे. माॅन्सून पुढच्या ३ दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटकचा उर्वरित भाग, अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, छत्तीसगड आणि ओडिशाचा आणखी काही भाग तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात माॅन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने आजपासून पुढील ४ दिवस राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह, विजा आणि वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT