Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : विदर्भ, मराठवाड्यात ३ दिवस पावसाचा अंदाज ; सात जिल्ह्यांना गारपीटीचा तर ३ जिल्ह्यांना `रेड अलर्टचा` इशारा

Weather Update : हवामान विभागाने आज अकोला,वाशीम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमधील काही ठिकाणी विजा आणि मेघगरर्जनेसह गारपीटीचा रेड अलर्ट देण्यात आला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील पावसाचे वातावरण कायं आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचे प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज आहे. तर इतर भागात काही ठिकाणी पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज आहे. 

विदर्भात आज पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने आज अकोला,वाशीम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमधील काही ठिकाणी विजा आणि मेघगरर्जनेसह गारपीटीचा रेड अलर्ट देण्यात आला.

तर यावेळी ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे. तर विदर्भातील बुलडणा, अमरावती, वर्धा आणि नागूपर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीटीचा ऑरेंज अलर्ट दिला. तर विदर्भातील इतर जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा, जळगाव, पुणे, नगर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. 

तर उद्या म्हणजेच गुरुवारी विदर्भातील वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात गारपीटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर विदर्भातील उर्वरित जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा तसेच नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला. तसेच सातारा, पुणे, नाशिक, जवळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला. 

शुक्रवारी वाशीम आणि वर्धा जिल्ह्यात गारपीटीचा ऑरेंज अलर्ट दिला. तर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये आणि संपूर्ण मराठवाडा, सोलापूर, सांगली आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज दिला. शनिवारी संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT