Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधारेचा अंदाज

Rain Forecast: राज्यातील काही भागात कालपासून हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावत आहे. मात्र सर्वदूर जोरदार पाऊस अद्यापही सुरु झाला नाही.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील काही भागात कालपासून हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावत आहे. मात्र सर्वदूर जोरदार पाऊस अद्यापही सुरु झाला नाही. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे.

राज्यात आज काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आज विदर्भातील भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, बुलडाणा जिल्ह्यातही ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मराठवाड्यातील जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यात ढगाळ हवामानासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकणातही ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

उद्या पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रतील कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे.

रविवारी पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

सोमवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा तर पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Growth: महाराष्ट्राच्या शेतीची अतिवृष्टीने वाताहत ; विकास दर ५.७ टक्क्यांनी घसरला

Agrowon Podcast: सोयाबीन आज स्थिर, कापूस भाव कमीच, हरभरा दबावात, वांग्याला उठाव, कारले टिकून

Maize Price: मक्याला एक हजार हमीभाव फरक द्या, अब्दुल सत्तार यांची विधानसभेत मागणी

Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढला; कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज कायम

Nana Patole statement : 'सरकारने 'बनिया' वृत्ती सोडावी'; सोयाबीन, कापूस, पिकविमा आणि पीएम किसानवरून नाना पटोलेंची सरकारवर टिका

SCROLL FOR NEXT