Rain And Sunny Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Weather Update : हवामान विभागाने पुढील ५ दिवसांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर काही ठिकाणी पावसाचा अंदाजही दिला आहे.

Anil Jadhao 

Pune News : देशात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. देशातील अनेक भागात उष्णतेची लाट आहे. तर आंध्र प्रदेशातील नांद्याल येथे सर्वाधिक ४६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. हवामान विभागाने पुढील ५ दिवसांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर काही ठिकाणी पावसाचा अंदाजही दिला आहे.

हवामान विभागाने आज आणि उद्या पश्चिम बंगाल, ओडिशा, तमिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर गुजरात, कोकण आणि गोव्यासह देशभरात उष्ण तापमानासह उकाडा राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज आणि उद्या कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्ण हवामान राहील तसेच उकाडाही जाणवेल असा अंदाज दिला. तर सोमवारपासून मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाजही दिला. 

हवामान विभागाने सोमवारी आणि मंगळवारी मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला.

तर बुधवारी विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया तसेच सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dryland Farming: कोरडवाहू शेतीतील जोखीम कमी तंत्रज्ञानातून जोखीम व्यवस्थापन

Gen Z Movement: ‘जेन झी’ आंदोलन : सावधानतेचा इशारा

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

SCROLL FOR NEXT