Weather Agrowon
हवामान

Weather Forecast : विदर्भात गारठा कायम राहण्याचा अंदाज

Weather Update : राज्यात किमान तापमानात वाढ होत असली, तरी राज्यात गारठा कायम आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा १० अंशांच्या खालीच आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात किमान तापमानात वाढ होत असली, तरी राज्यात गारठा कायम आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा १० अंशांच्या खालीच आहे. आज (ता. २७) राज्याच्या किमान तापमानात चढ - उतार होण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. मंगळवारी (ता. २६) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळे येथे ८.४ अंश सेल्सिअस झाली आहे.

तर परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ९ अंश आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २६) विदर्भात गारठा कायम राहण्याची, तर उर्वरित राज्यात किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.८ (१२.३), धुळे ३१.५ (८.४), जळगाव ३०.४ (११.९), कोल्हापूर ३०.४ (१७.१), महाबळेश्‍वर २९.१ (१६.२), नाशिक ३१.२ (१२.६), निफाड ३० (१०), सांगली ३०.७ (१५.२), सातारा ३२ (१४.२), सोलापूर ३३.४ (१६), सांताक्रूझ ३४.९ (१८.७), डहाणू ३०.३ (१८.६), रत्नागिरी ३५.६ (२०.९), छत्रपती संभाजीनगर २९.८ (१२.६), नांदेड २९.६ (१४.२), परभणी ३०.२ (१३.२), अकोला ३२.३ (१४.१), अमरावती २९.८ (१४.३), बुलडाणा ३१ (१४), ब्रह्मपुरी ३१.४ (१४), चंद्रपूर २८.८(१२), गडचिरोली ३०.२ (१२.२), गोंदिया २८.८ (११.४), नागपूर २९.८ (१४.२), वर्धा ३० (१४), वाशीम ३१.६ (१२.६), यवतमाळ ३१.६ (१२.५).

उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी

उत्तर भारतात थंडी कमी - अधिक होत आहे. मंगळवारी (ता. २६) राजस्थान येथील अलवर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये अनेक भागांत किमान तापमान ६ ते १० अंशांच्या दरम्यान स्थिरावले आहे. उत्तरेकडून महाराष्ट्राकडे येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह काहीसे कमी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Crop Damage: अवकाळी, गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु, शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषिमंत्र्यांची विधानसभेत माहिती

Women Empowerment: महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ देण्यासाठी प्रयत्नशील

Farmer Protest: आंबा, काजू बागायतदारांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला

PAN Card Rules: पॅन कार्ड प्रक्रियेत मोठे बदल; १ एप्रिलपासून नवे नियम लागू, जाणून घ्या माहिती

Sugarcane FRP: सांगलीतील १० कारखान्यांकडे २८० कोटी एफआरपी थकीत

SCROLL FOR NEXT