Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : उद्यापासून पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागात पुढील ४ दिवस पावसाची शक्यता

Rain Alert : राज्याच्या अनेक भागात कालपासून पावसाची उघडीप दिसून आली. तर काही काही भागात उघडीप आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या अनेक भागात कालपासून पावसाची उघडीप दिसून आली. तर काही काही भागात उघडीप आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाची हजेरी राहीली. पण राज्याच्या काही भागात उद्यापासून पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. 

हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे त तसेच कोकणातील रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने व्यक्त केला. आज मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात पावसाची उघडीप पाहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्यापासून कोकण आण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र कोकण आणि मराठवाड्यात पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे. उद्या विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

गुरुवारी आणि शुक्रवारी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. दोन्ही दिवस विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही भागात हलक्या मध्यम ते जोरदार सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT