Monsoon Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : मराठवाड्यात पाऊस उघडीप देणार; दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज

Rain Alert : हवामान विभागाने आणखी दोन दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी ऊन सावल्यांचा खेळ सुरु असल्याचे दिसते. हवामान विभागाने आणखी दोन दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने आज राज्यभारत सर्वच जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी जोर काहीसा अधिक राहण्याचा अंदाज आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांना काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. राज्यभरात विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज देण्यात आला. 

शनिवारी राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया तसेच वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 

रविवारी विदर्भात पुन्हा पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. तर पूर्व विदर्भातील काही भागात अतिजोरदार पावसाचाही अंदाज देण्यात आला. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रविवारी पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज आहे. मराठवाड्यात पावसाची विश्रांती राहण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकणात रविवारी पावसाचा जोर वाढण्याचाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT