Monsoon Agrowon
हवामान

Weather Update : मॉन्सून पूर्व पावसाचे राज्यावर ढग

Rain Update : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर असलेल्या गोव्यात दाखल झाला आहे. मॉन्सूनचे आगमन अवघ्या काही तासांवर आले असतानाच, महाराष्ट्रावर पूर्व मोसमी पावसाच्या ढगांची छाया पसरली आहे.

अमोल कुटे

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर असलेल्या गोव्यात दाखल झाला आहे. मॉन्सूनचे आगमन अवघ्या काही तासांवर आले असतानाच, महाराष्ट्रावर पूर्व मोसमी पावसाच्या ढगांची छाया पसरली आहे. आज (ता. ५) राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला आहे.

पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमानात वेगाने घट होऊ लागली आहे. विदर्भ वगळता बहुतांश महाराष्ट्रात कमाल तापमान ४० अंशांच्या खाली घसरले आहे. मंगळवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अमरावती येथे उच्चांकी ४३ अंश तापमानाची नोंद झाली.

राज्यात सापेक्ष आर्द्रता वाढत असून, पश्चिमेकडील वाऱ्यांचे प्रवाह बळकट होत असल्याने मॉन्सूनच्या आगमनास पोषक हवामान होत आहे. आजपासून (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा ढगाळ हवामान व उकाडा कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मंगळवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.३, धुळे ४१.०, जळगाव ४१.७, कोल्हापूर ३५.२, महाबळेश्वर २८.०, मालेगाव ३९.८, नाशिक ३५.५, निफाड ३६.८, सांगली ३५.३, सातारा ३५.४, सोलापूर ३९.१, सांताक्रूझ ३५.५, डहाणू ३७.२, रत्नागिरी ३५.०, छत्रपती संभाजीनगर ३८.८, बीड ३९.९, नांदेड ३८.२, धाराशिव ३८.९, परभणी ४०.१, अकोला ४१.६, अमरावती ४३.०, भंडारा ३९.५, बुलडाणा ३८.५, ब्रह्मपुरी ४१.८, चंद्रपूर ३८.२, गडचिरोली ३८.२, गोंदिया ४०.२, नागपूर ४१.८, वर्धा ४२.१, वाशीम ४०.४, यवतमाळ ४०.५

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, हिंगोली.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026: माॅन्सूनची आगेकूच सुरुच; माॅन्सूनने संपूर्ण अंदमान आणि निकोबर बेटे व्यापून वाटचाली कायम ठेवली

Farm Loan Repayment: यंदाच्या वर्षातील वसूलपात्र रक्कम मुदतीत भरा : मंत्री हसन मुश्रीफ

Onion Rate Issue: कांदा साठवावा तर सडतोय, विकावा तर मातीमोल भाव

Interview with Raju Shetti: ‘कोकणच्या पुढाऱ्यांनी प्रश्‍नांचं गांभीर्य समजून घ्यावं’

Khandesh Irrigation Projects: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण

SCROLL FOR NEXT