Rain Update  Agrowon
हवामान

Rain Alert : राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता

Rain Forecast : राज्यात पाऊस ओसरल्यानंतर आज (ता. ९) रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची इशारा (येलो अलर्ट) आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पाऊस ओसरल्यानंतर आज (ता. ९) रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची इशारा (येलो अलर्ट) आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

झारखंड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या गंगानगर पासून रोहतक, आग्रा, चुर्क, रांची, बालासोर ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर कर्नाटकपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

गुरूवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. तर विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाल्याचे दिसून आले. कोकणातील संगमेश्वर येथे उच्चांकी ११० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

आज (ता. ९) कोकणातील रायगड जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्याचा घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची 'येलो अलर्ट' आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, पुणे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, वर्धा, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT