Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता

राज्यात सुरू असलेला वादळी पाऊस उघडीप देण्याची चिन्हे आहेत. उद्यापासून (ता. ७) राज्याच्या बहुतांश भागात मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Weather Update Pune राज्यात सुरू असलेला वादळी पाऊस उघडीप देण्याची चिन्हे आहेत. उद्यापासून (ता. ७) राज्याच्या बहुतांश भागात मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता आहे.

आज (ता. ६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.

शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धाराशिव, नांदेड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला असून, शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३७ अंशांच्या दरम्यान आहे.

तामिळनाडू किनारपट्टी आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर, तसेच उत्तर कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आज (ता. ६) मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.३ (२१.२), जळगाव ३६.० (२२.६), कोल्हापूर ३४.३ (२२.०), महाबळेश्वर २८.० (१५.६), नाशिक ३३.५(२१.०),

निफाड ३६.१ (२१.७), सांगली ३५.८ (२२.१), सातारा ३५.४ (२०.९), सोलापूर ३७.६ (२२.७), सांताक्रूझ ३२.४ (२६.०), डहाणू ३२.५ (२५.०), रत्नागिरी ३३.६ (२४.७),

छत्रपती संभाजीनगर ३१.० (२१.०), नांदेड ३२.४ (२१.२), धाराशिव ३५.६ (२०.८), परभणी ३४.५ (२१.७), अकोला ३३.८ (२२.९), अमरावती ३२.०(२०.३), बुलढाणा ३२.० (२२.२), ब्रह्मपूरी ३५.० (२२.८),

गडचिरोली ३४.२(२२.०), गोंदिया ३४.४ (२२.०), नागपूर ३२.८ (२१.१), वर्धा ३३.५(२२.६), वाशीम ३१.८ (२२.२), यवतमाळ ३३.० (२१.५).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र, : नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.

मराठवाडा : धाराशिव, लातूर.

विदर्भ : वाशिम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

कमी दाब क्षेत्रासाठी पोषक स्थिती

बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आज (ता. ६) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे या भागात उद्यापर्यंत (ता. ७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे, तसेच या प्रणालीची तीव्रता वाढून उपसागरात चक्रीवादळ घोंघावण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. ही वादळी प्रणाली उत्तरेकडे सरकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू दरात सुधारणा, उडीद दर टिकून, बटाटा बाजारात चढ-उतार, पेरू दरात तेजी, चिकू दरात चढ-उतार

Shri Mangal Wheat: ‘श्री मंगल’ गव्हाचा नवा वाण ; हेक्टरी ५२ क्विंटल उत्पादनाची क्षमता

Crop Damage Survey: अहिल्यानगरला साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण

Shivraj Singh Chouhan: काँग्रेसच्या सलग पराभवाला कारण कोण? शिवराज सिंह चौहान यांचा राहुल गांधींवर निशाणा

Monsoon Return: देशाच्या उर्वरित भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती; राज्यात उन्हाचा चटका कायम

SCROLL FOR NEXT