Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता

Rain Forecast : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News : पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. यातच उन्हाचा चटका, उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. आज (ता. २२) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

पश्‍चिम राजस्थान आणि कच्छमधून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यास पोषक हवामान होत आहे. सोमवारी (ता. २३) मॉन्सूनची परतीची वाटचाल सुरू होण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, गुना, मंडला, राजनंदगाव, गोपालपूर ते पूर्व - मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पूर्व-मध्य बंगालचा उपसागर, तसेच थायलंडच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. या दोन्ही प्रणालींच्या प्रभावामुळे पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात उद्यापर्यंत (ता. २३) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

पावसाच्या दडीने कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हीटचा अनुभव येत आहे. शनिवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा, यवतमाळ, सोलापूर येथे तापमान ३५ अंशांवर पोहोचले आहे. उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, उकाड्याने घामटा निघत आहे.

परतीच्या पावसासाठी पोषक हवामान होत असतानाच, राज्यातही वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. आज (ता. २२) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पुणे, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा.

विजांसह पावसाची शक्यता : नगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Politics: यापुढे चुकीला माफी नाही

Lumpy Disease Issue: लम्पीने अहिल्यानगरला १४, मोहोळमध्ये दोन पशुधन दगावले

Malin Village : पुनर्वसन झाले, मात्र गावचे गावपण हरपले

Banana Export Workshop: निर्यातक्षम केळीबाबत वसईत शनिवारी परिसंवाद

Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री कोकाटे यांना अभय मिळाल्याची चर्चा

SCROLL FOR NEXT