Cloudy Weather Agrowon
हवामान

Rain Forecast : राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता

Weather Update : पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे राज्यात थंडी कमी झाली असतानाच राज्यात अनेक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.

अमोल कुटे

Pune News : पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे राज्यात थंडी कमी झाली असतानाच राज्यात अनेक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात थंडी कमी झाली असून, मंगळवारी (ता. ९) उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात थंडी कमी झाली असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान १४ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने कोकणातील रत्नागिरी आणि हर्णे येथे देशातील उच्चांकी आज ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यापासून दक्षिण गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली. आज (ता. १०) मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

मंगळवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.३ (१८.२), धुळे ३१.० (१२.६), जळगाव (१५.४), कोल्हापूर ३०.१ (२१.९), महाबळेश्वर २५.७ (१५.१), नाशिक (१७.७), निफाड २८.४ (१४.५), सांगली २९.९ (२२.२), सातारा ३१.२ (२०.२), सोलापूर ३१.८(२१.३), सांताक्रूझ ३५.१ (२२.२), डहाणू ३३.२ (२०.६), रत्नागिरी ३५.२ (२२.५),

छत्रपती संभाजीनगर २९.४ (१६.२), नांदेड (१८.८), परभणी ३०.२ (१७.०), अकोला ३०.८ (१६.०), अमरावती २९.० (१६.३), बुलडाणा २९.६ (१६.४), ब्रह्मपुरी ३२.० (१५.९), चंद्रपूर २९.२ (१४.०), गडचिरोली ३०.० (१५.२), गोंदिया २९.८ (१४.४), नागपूर २९.६(१५.६), वर्धा ३०.२(१६.०), वाशीम ३०.२ (१४.२), यवतमाळ ३०.५ (१५.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता; राज्यातील काही भागात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज

Khandesh Rain Damage: खानदेशात पावसाने १८ हजार हेक्टरला फटका

Maize Procurement Issue: बाजारात मका दर हमीभावापेक्षा कमी

Farm Subsidy Delayed: कृषी यांत्रिकीकरणाच्या अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

Mango Crop Compensation: आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई मंजूर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT