Rain Forecast  Agrowon
हवामान

Rain Forecast : कोकण, घाटमाथ्यावर पाऊस पुन्हा जोर धरणार

Latest Weather Update : राज्यात दोन दिवसांपासून ओसरलेला पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Weather Forecast : राज्यात दोन दिवसांपासून ओसरलेला पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. आज (ता. १) कोकणासह, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ओडिशा, पश्चिम बंगाल किनाऱ्यालगतच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाले असून, त्याला लागून समुद्र सपाटीपासून ९.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाब पट्ट्याचे पश्चिमेकडील टोक हिमालयाच्या पायथ्याकडे गेले आहे. मॉन्सूनचा आस बिहारच्या दरभंगा पासून देवघर, कैनिंग, कमी दाबाचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. नैर्ऋत्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे सक्रिय आहे.

राज्यात सुरू असलेला पाऊस ओसरल्यानंतर राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळात अधून-मधून हलक्या सरी कोसळत आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने आज (ता. १) कोकणासह, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा 'येलो अलर्ट' आहे. खानदेश, मराठवाडा, पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT