Maharashtra Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस

Latest Rain Update : राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम पाऊस पडला.
Konkan Rain
Konkan Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम पाऊस पडला. कोल्हापुरातील कडगाव येथे ७६.८ मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला असून, पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतातील रखडलेल्या कामांना पुन्हा सुरुवात आहे.

गेल्या काही दिवसांत घाटमाथ्यावर पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता या भागातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. रविवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंत दावडी घाटमाथ्यावर १६२ मिलिमीटर, शिरगाव १४५, ताम्हिणी ११२, आंबोणे ११०, कोयना नवजा १०८ मिलिमीटर पाऊस पडला. तर शिरोटा, ठाकूरवाडी, लोणावळा, वळवण, वानगाव, भिवपुरी, डुंगरवाडी, खोपोली, खांड, भिरा, धारावी या घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस पडला.

Konkan Rain
Vidarbha Rain : विदर्भात पावसाचा अंदाज

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडला. तर अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. रायगडमधील नेरळ येथे सर्वाधिक ६८ मिलिमीटर पाऊस पडला. तर डोलखांब येथे ५१.३, कडाव ५१.८, कशेले ५१.८, धसई ५०.८ मिलिमीटर पाऊस पडला.

त्यामुळे कोकणातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी, सूर्या, वाशिष्टी या नद्यांची पाणीपातळी इशारा पातळीपेक्षा कमी झाली असून, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तर जगबुडी नदीची पाणी पातळी अजूनही इशारा पातळीपेक्षा वर आहे.

खानदेशातील नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. पुण्यातील माले मंडलात ७४ मिलिमीटर, तर साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे ६७ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी अजूनही इशारा पातळीपेक्षा वर आहे.

सध्या धरणात अजूनही पाण्याची आवक सुरू असली, तरी काही धरणांतून मागील आठ दिवसांत सोडलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे. कृष्णा, कोयना, भीमा, मुठा या नद्यांची पाणीपातळी कमी झाली आहे. जळगाव, नगर, सोलापूर, सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पूर्व भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे या भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, विदर्भातील बुलडाणा, गोंदिया जिल्ह्यांत काही ठिकाणी तुरळक हलका पाऊस पडला. या भागात मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा प्रभाव कमी झाल्याने आता शेतीकामे वेगात सुरू झाली आहेत. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले, तर अनेक ठिकाणी रोग, किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.

Konkan Rain
Maharashtra Rain Update : राज्यातील पावसाचा जोर ओसरला

राज्यात रविवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडळनिहाय पाऊस, मिलिमीटरमध्ये : स्रोत ः कृषी विभाग

कोकण : मुरबाड ४२.३, खर्डी ४०.५, गोरेगाव, कुंभार्ली ४०.८, बदलापूर ४२.८, पवयंजे ४६.५, मोराबे ४६.५, कळंब ४९.८, आटोने ४६, आंगवली ४०.५, कडावल ३५.३, वैभववाडी ३५.५, येडगाव ३३, भुईबावडा ३५.५, मांडवी, विरार, मानिकपूर २८

मध्य महाराष्ट्र : ननाशी २३, इगतपुरी २३.५, धारगाव ३३.८, कुडाशी, उमरपट्टा २३.५, मोलगी २६, मुठे ३६, भोलावडे ३१.५, निगुडघर २९.३, काले २९.८, कार्ला ३६.८, खडकाळा २१, लोणावळा ३९.३, शिवणे २१.३, वेल्हा ५७.५, पाणशेत २०, वाडा २०, आंबेगाव ५४.८, दहिवड २०.३, परळी २६.८, हेळवाक, मोरगिरी ४१.५, बाजार भोगाव २९, करंजफेन २३.५, आंबा २४, गगनबावडा ३५.५, साळवण ३१.५, चंदगड २२.५,

मराठवाडा : चिंचोली लिंबाजी १४.३, कुंभारझरी २७.८, टेंभुर्णी २१.८, अंबड २७.५, रोहिलागड ११.५, सुखापुरी २७.५, घनसावंगी १५.८, तळणी २४.५, भोकर १०.८, शिवणी १३, कळमनुरी ११, साखरा १२.५,

विदर्भ : मेहुनाराजा २७.८, दुसरबीड ११.८, बीबी १७.५, टिटवी २४.५, नरवेल १३, कामठा १४.५, सालकेसा २५, आमगाव खुर्द ४९.८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com