Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : तापमानाची होळी पेटली

Summer Heat : राज्यात कमाल तापमानाचा पारा सातत्याने वरच जात असल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्यातच सूर्य आग ओकायला लागल्याने उन्हाच्या चटका वाढला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात कमाल तापमानाचा पारा सातत्याने वरच जात असल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्यातच सूर्य आग ओकायला लागल्याने उन्हाच्या चटका वाढला आहे. तापमान चाळीशीपार गेल्याने तीव्र उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र आहे. आज (ता. २६) राज्यात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

विदर्भापासून उत्तर अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. विदर्भ, मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान आहेत. तर उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, दुपारच्या वेळी झळा असह्य होत उकाड्यात वाढ झाली आहे.

सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे देशातील उच्चांकी ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मालेगावसह अकोला, यवतमाळ, सोलापूर आणि ब्रह्मपुरी येथे तापमान चाळीशीपार आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३९ अंशांच्या पुढे आहे. राज्याच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३७.७, धुळे ३८.५, जळगाव ३९.३, कोल्हापूर ३७.५, महाबळेश्वर ३२.०, मालेगाव ४०.८, नाशिक ३६.८, निफाड ३६.४, सांगली ३८.४, सातारा ३८.५, सोलापूर ४०.०, सांताक्रूझ ३२.५, डहाणू ३२.५, रत्नागिरी ३३.६,

छत्रपती संभाजीनगर ३७.८, नांदेड ३९.२, परभणी ३९.५, अकोला ४०.५, अमरावती ३९.४, बुलडाणा ३७.६, ब्रह्मपुरी ४०.०, चंद्रपूर ३८.८, गडचिरोली ३६.६, गोंदिया ३७.५, नागपूर ३९.२, वर्धा ३९.९, वाशीम ३९.८, यवतमाळ ४०.२.

४० अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

मालेगाव ४०.८, अकोला ४०.५, यवतमाळ ४०.२, सोलापूर ४०, ब्रह्मपुरी ४०,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT